विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित विमा कर्मचारी सेनेने शिवसहकार पॅनेलच्या माध्यमातून विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २१ पैकी २१ जागा जिंकत इतिहास घडवणाऱ्या सर्व विजयी उमेदवार आणि विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले. विमा कर्मचारी सेनेचे विजयी उमेदवार: दिनेश बोभाटे, प्रशांत सावंत, अंकुश कदम, सचिन खानविलकर, जगदीश वेताळ, मनोहर लाड, निलेश जुवेकर, मिलिंद सारंग, केदार बोरवणकर, विजय बिरमोळे, शैलेश दाभोलकर, सुभाष शेलार, संतोष ठाकूर,आल्हाद नाईक, स्वप्निल धेंडे, प्रकाश आंग्रे, संजय चेवले, सागर खानविलकर, संतोष काकड, क्षितिजा मेश्राम, समृद्धी जाधव. #shivsena #शिवसेना #Mumbai #UddhavThackerey
शिवसेना(UBT) पक्षाने भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्याची हकालपट्टी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन जाहीर केले! #शिवसेना #shivsena #UddhavThackerey
📍 आनंद आश्रम, #ठाणे | #मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा विभागातील प्रभाग क्रमांक १७३ मधील उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह, शाखा संघटीका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटीका नंदा पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यांच्या भागांतील प्रश्न त्यांनी यावेळी वाचून दाखवले असून त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित असून ते शासनाच्या माध्यमातून नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगून त्यांना आश्वस्त केले. तसेच गेल्या अडीच वर्षाचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला असून यापुढेही करत राहू असे यावेळी बोलताना नमूद केले. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #shivsena #Mumbai #EknathShinde #maharashtra @EknathShinde